यंदाची दिवाळी कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छानियम पाळून आरोग्यदायी दिवाळी साजरी करुया


 

            मुंबईदि. 3 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धीसमाधानआनंदउत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईने अंध:कार दूर होऊन सर्वांचे जीवन प्रकाशमय होवो. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरोअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले कीदिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचाप्रकाशाचासर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञानअंधश्रद्धाअनिष्ट रुढी, परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्यसुख-शांतीउत्तम आरोग्याची समृद्धी येवो. दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीबवंचितदुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया. कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आरोग्यदायी दिवाळी साजरी करुयाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget