22 सुवर्ण, 23 रजत अशा एकूण 45 पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून युवक-युवतींचे अभिनंदन
 गांधीनगर येथील प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश


            मुंबईदि. १ नोव्हेंबर २०२१ : केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदकेअशा एकुण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्यातून आता एकुण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकुण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.  स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकुण ४५)राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६)गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकुण १२)मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकुण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकुण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.

            या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता जागतिक स्पर्धेतील विजयाचे ध्येय ठेवावे - प्रधान सचिव मनिषा वर्मा

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या कीराज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. गांधीनगर येथील प्रादेशिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धकांनी आता राष्ट्रीय स्पर्धेची आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक स्पर्धेची जय्यत तयारी करावी. स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने विभाग संपूर्ण मदत करेलअसे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील तरुणांचे यश अद्भूत - दीपेन्द्र सिंह कुशवाह

            कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह म्हणाले कीगांधीनगर येथील स्पर्धेत महाराष्ट्रातील तरुणांनी मिळविलेले यश अद्भूत असेच आहे. यासाठी या तरुणांनी फार मेहनत घेतली आहे. आता राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठीही त्यांनी अशीच तयारी करावी. या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

सुवर्ण पदक विजेते

            राज्यातील मोहम्मद सलमान अन्सारीरिंकल करोत्रादिशा सोनवणेकोमल शिवाजीराव कोडलीकरअंकीता अंबाजी गांगुर्डेज्ञानेश्वर बाबुराव पांचाळस्टॅनली सोलोमनयोगेश दत्तात्रय राजदेवदेवेज्याश्रीराम कुलकर्णीलावण्या पुंड,  विश्वजित रेवनाथ भुर्केआयुषी अरोरापुर्वी सिधपुरागणेश भावे दगडोबामित्रा रावअर्जुन मोगरे,  ओंकार गौतम कोकाटेजीवन संपत चौधरीतोजांगण रवींद्र ढाणूविकास चौधरीसजिव कुमार सबवथ यांनी सुवर्ण पदक पटकावले.

रजत पदक विजेते

            मिलींद निकमयोगेश अनिल खंडागळेसलमान रफीक शेखवेद इंगळेहर्षल गजानन शिरभातेसचिन भारत जाधववृंदा पाटीलसृष्टी मित्रायश दिनेश चव्हाणआकांक्षा केलास पवारमिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेगप्रियांका सिद्धार्थ टिळकयोगेश दत्तू गनगोडेप्रतिक राजेंद्र हिनघेदआनंद फकिरा घोडकेध्रुव पाटीलओम विनायक गायकवाडअश्लेषा भरत इंगवलेअभिषेक भाई पाटीलमोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीमआदित्य दीपक हुगे,  भार्गव कुलकर्णीजुनेद अडेनवाला यांनी रजत पदक पटकावले.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget