साखर कारखान्यांसाठीच्या दक्षता पुरस्कारात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
·        वर्ष 2019-20 आणि 2020-21 चे पुरस्कारांचे वितरण

 

            नवी दिल्ली, 16 : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहोर उमटवली आहे.

            येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने दक्षता पुरस्काराचे  वितरण करण्यात आले. वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी.एल. वर्माराज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य खासदार शरद पवारगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलआरोग्य मंत्री राजेश टोपेमाजी मंत्री हर्षवर्धन पाटीलफेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरकार्यकारी संचालक प्रकाश नायकनवरेयांच्यासह अन्य मान्यवर मंचावर  उपस्थित होते.

            वर्ष 2019-20 मध्ये एकूण 92 तर वर्ष 2020-21 मध्ये 108 साखर कारखान्यांनी पुरस्कारांसाठी भाग घेतला होता. कारखान्यांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारावर करून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मुल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के  व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले साखर कारखाने अशा दोन श्रेणींमेध्ये मूल्यमापन झाले. केन डेव्हल्पमेंट पुरस्कारतांत्रिक दक्षता पुरस्कारआर्थिक व्यवस्थापन पुरस्कारसर्वाधिक केन क्रशिंग पुरस्कारसर्वाधिक साखर वसुली पुरस्कारउत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कारकमाल साखर निर्यात पुरस्कार अशी पुरस्कारांची विभागणी करण्यात आलेली आहे. पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री श्री.वर्माखासदार श्री.पवारश्री.वळसे-पाटीलश्री.टोपे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

वर्ष 2019-20 आणि 2020-21 चे पुरस्कार पुढील प्रमाणे

वर्ष 2019-20 चे  पुरस्कार

            ‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ हा पुरस्कार साखर कारखान्यांच्या सर्वसमावेशक कामांसाठी दिला जातो. हा पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मर्यादितआंबेगाव पुणे यांना मिळाला.

            प्रथम आणि व्दितीय केन डेव्हल्पमेंट पुरस्कार’ महाराष्ट्राच्या डॉ पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना मर्यादितकडेगाव सांगली आणि अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रेसातारा यांना‍ प्राप्त झाला .

             ‘तांत्रिक दक्षता पुरस्कार’ हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. यामध्ये  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नरपुणे आणि क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित पलुससांगली यांना मिळाला आहे.

            ‘आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ चा द्वितीय पुरस्कार राज्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना मर्यादित अंबडजालनाला  मिळाला.

             ‘सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार’ चा  प्रथम पुरस्कार राज्यातील कुंभी-केसरी सहकारी साखर कारखाना मर्यादितकरवीरकोल्हापूर ला मिळालेला आहे.

            ‘कमाल साखर निर्याती पुरस्कार’ चा प्रथम पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकणंगलेकोल्हापूर आणि द्वितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराडसाताराला प्रदान करण्यात आला आहे.

वर्ष 2020-21 चे पुरस्कार पुढीलप्रमाणे

            ‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ हा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना मर्यादित माळशिरससोलापूर यांना प्रदान करण्यात आला.

            सर्वसमावेशक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पश्चिम झोनचा पुरस्कार श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना मर्यादित कागलकोल्हापूरला मिळाला.

            प्रथम आणि व्दितीय केन डेव्हल्पमेंट पुरस्कार राज्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित शिरोळाकोल्हापूर आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित वाळवासांगली ला प्राप्त झाला आहे.

            तांत्रिक दक्षता पुरस्कार हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. यामध्ये  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नरपुणे आणि डॉ.पंतगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित कडेगावसांगली ला मिळाला आहे.

            ‘सर्वाधिक ऊस गाळपचा पुरस्कार’  जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकणंगलेकोल्हापूरला  प्राप्त झाला आहे.

            ‘सर्वाधिक साखर वसुलीचा पुरस्कार’  अज्यिंकतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रेसाताराला प्राप्त झाला आहे.

             ‘कमाल साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार’ विठ्ठलराव शिंदे शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित माढासोलापूर आणि व्दितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराडसातारा ला प्रदान करण्यात आला आहे.

0000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget