(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज “महाराष्ट्र दिन” | मराठी १ नंबर बातम्या
" />

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज “महाराष्ट्र दिन”

             नवी दिल्ली, 25 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या दि.26 नोव्हेंबर रोजी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन’ साजरा केला जाणार आहे. येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दिनाचे उद्घाटन अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त (महाराष्ट्र सदन) शामलाल गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे सचिव अपुर्व चंद्र हे असणार आहेत.

            पिनॅक इव्हेंट्स ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने महाराष्ट्राची लोककला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मेळाव्यातील  एम्फी  थिएटर (हॉल क्रमांक 2 ते 5 जवळ)  येथे सांयकाळी 5:30 वाजता  होणार आहे.

            भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या बाराव्या  दिवशी शुक्रवारी महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमात गणेश वंदनाभुपाळीओवीभारूडगोंधळगणगवळणपोवाडाशाहिरीलावणी,  कोळी गीतजागरणजोगवा असे लोककलेचे विविध प्रकार सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गायक स्वत: गायन करतील आणि त्यावर कलाकार त्यांची-त्यांची कला सादर करतील.

            या सांस्कृतिक कार्यक्रमास येथील दिल्लीकरांनी अधिकाधिक  प्रतिसाद  द्यावाअसे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांनी केले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget