बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

              मुंबईदि. 15 : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे कार्य प्रेरणादायी आणि अतुलनीय असून बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिकआर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासनही सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पहिल्या जनजातीय गौरव दिनाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

            या कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमारआदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडआदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे आदि उपस्थित होते.

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणालेबिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन म्हणून शासनाने त्यांचा जयंती दिन 'जनजातीय गौरव दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग आहे. आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढीप्रथापरंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायशेती यांना चालना दिली तर दुर्गम भागात राहणारा हा समाज प्रगती करेल. असेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

            यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते सामूहिक वन हक्क दावे लाभार्थीवैयक्तिक वन हक्क दावे लाभार्थीवनहक्क पट्टे  मिळालेले लाभार्थीप्रकल्प अधिकारी डहाणू अंतर्गत आश्रमशाळा येथील सर्वात लहान उपग्रह निर्मिती प्रकल्पातील सहभागी जागतिक विक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारमहाराष्ट्र शासनातर्फे सुपर 50 विशेष कार्यक्रमाअंतर्गत जे.ई.ई. आणि नीटमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थीराज्यातील एकलव्य निवासी शाळा मधील विद्यार्थीमाऊंट एव्हरेस्ट सर केलेले गुणवत्ताधारक विद्यार्थीनागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेले विद्यार्थीआदिवासी समाजातील शासकीय योजनेचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकचित्रपट कलाकार, धातूपासून शिल्प तयार करणारे कलाकारमहिला बचत गटधारक यांचा सत्कार करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना टॅबचेही वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी बांधवांनी ढोल नृत्य आणि तारपा नृत्य सादर केले,यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांनी उभारलेल्या बचतगटाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले.

**

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget