मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 


 

            मुंबईदि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.

             राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्ररहिवासी प्रमाणपत्रउत्पन्नाचा दाखलाशैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती2 पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

            वसतिगृहाचे नावपत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक  पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहबी.डी.डी.चाळवरळी-118मुंबई-400018संपर्क क्र. 8830316553 ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहवरळी-116बी.डी.डी.चाळवरळी-116मुंबई-400018संपर्क क्र. 8830316553 ; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृहवरळी-116बी.डी.डी.चाळवरळी-116मुंबई-400018संपर्क क्र.9987790430 असे  पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

                                                                  *****


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget