(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत सातव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर | मराठी १ नंबर बातम्या
" />

कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत सातव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर



*एकूण २८२ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के रुग्ण*


*२८२ पैकी फक्त १७ जणांनाच रुग्णालयात करावे लागले दाखल*


*ओमायक्रॉन बाधित १५६ पैकी केवळ ९ जणांना रुग्णालयीन उपचारांची भासली गरज*


*नमुने संकलित केलेल्यांपैकी डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू*


मुंबई : कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱया चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत सातव्या तुकडीमध्ये मुंबईतील २८२ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे ५५ टक्के रुग्ण आढळले आहेत.


बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८२ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८२ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत. 

सदर २८२ रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

० ते २० वर्षे वयोगट  - ४६ रुग्ण (१६ टक्के)  

२१ ते ४० वर्षे वयोगट - ९९ रुग्ण (३५ टक्के)

४१ ते ६० वर्षे वयोगट - ७९ रूग्ण (२८ टक्के)

६१ ते ८० वयोगट - ५४ रुग्ण (१९ टक्के)

८१ ते १०० वयोगट - ४ रुग्ण (१ टक्के)


कोविड विषाणू उपप्रकारानुसार या २८२ बाधित रुग्णांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

डेल्टा व्हेरिअंट - ३७ रुग्ण (१३ टक्के)

डेल्टा डेरिव्हेटीव्ह - ८९ रुग्ण (३२ टक्के) 

ओमायक्रॉन - १५६ रुग्ण (५५ टक्के)

ओमायक्रॉन विषाणू उपप्रकाराची बाधा झालेल्या १५६ पैकी फक्त ९ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत, त्यांना प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही. असे असले तरी, नागरिकांनी गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे.


या २८२ पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये ३२ जण मोडतात. पैकी,

४ जणांना डेल्टा व्हेरिअंटची बाधा

१२ जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्हची लागण

१६ जणांना ओमायक्रॉनची बाधा


कोविड लसीकरण निकष लक्षात घेता, २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी,

पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल.

दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे १० जण रुग्णालयात दाखल. 

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ८१ पैकी चार जण रुग्णालयात दाखल.

डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती ही ६० वर्षेपेक्षा अधिक वयाची ज्येष्ठ नागरिक होती. त्यांना मधुमेह व अतिदाबाचाही त्रास होता. तसेच त्यांनी कोविड लसीचा फक्त पहिला डोस घेतला होता.


कोविड विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसल्याने, नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. सर्वांनी मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन कठोरपणे करणे आवश्यक आहे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे.

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करुन घेणाऱयांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱयांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.

***

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget